VIDEO : पुराच्या पाण्यात तरुणाने मारली उडी, पुढे काय झाले ते तुम्हीच पाहा
Rain and Flood In West Vidarbha : पश्चिम विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नद्या-नाल्यांना पूर आला आहे.
बुलडाणा / परभणी : Rain and Flood In West Vidarbha : पश्चिम विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नद्या-नाल्यांना पूर आला आहे. मात्र, काहींनी पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ देखील काढला. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुरात उडी मारलेला तरुण काही अंतरापर्यत वाहत गेला. किशोर गवई असे उडी मारलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने कोलवड येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारली.
दरम्यान, परभणीच्या सेलू तालुक्यातील कूपटा इथं पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अधिक उंचीचा पूल नसल्यानं इथं हलका पाऊस जरी झाला तरी या पुलावरून पाणी वाहतं. याच पुलावर काही तरुण पुराच्या पाण्यातून जाण्याचं नाहक धाडस करत स्टंटबाजी करत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. खामगाव तालुक्यातील बल्लाळी नदीला पूर येऊन पुराचं पाणी गावात शिरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह पश्चिम विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बल्लाळी नदीच्या पुराचे पाणी निपाणा गावात शिरले असून अनेक घरात आणि मंदिरांमध्ये हे पाणी तुंबले आहे. पूर परिस्थिती पाहता गावकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
दरम्यान देऊळघाट आणि कोलवड येथून वाहत जाणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना एका माथेफिरू तरुणाने पुराच्या पाण्यात उडी घेतली मात्र काही अंतरावर जाऊन त्याने झाडाला पकडले आणि तो सुदैवाने वाचला.