मुंबई : पादचाऱ्यांना ही रस्ता ओलांडता यावी यासाठी रस्त्यांवर फूट ओव्हरब्रिज बांधण्यात आले आहेत.रस्त्यावर फूट ओव्हरब्रिज झाल्यानंतर नागरिकांची धावणाऱ्या वाहनांमधून रस्ता ओलांडण्यापासून सुटका होते. सहसा व्यस्त असणाऱ्या रस्त्यांवर फूट ओव्हरब्रिज बांधले जाते.त्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितता मिळते. मात्र पालघरमध्ये एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच व्यस्त असणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (mumbai ahmedabad highway) एका रिक्षाचालकाने (autorickshaw driver) यूटर्न घेण्यासाठी चक्क फूट ओव्हरब्रिजचा वापर केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिक्षाचालकाने युटर्न घेण्यासाठी रिक्षा फूट ओव्हरब्रिजवर चढवली आणि रस्ता ओलांडला.


फूट ओव्हरब्रिजवरून ऑटोरिक्षा जात असल्याचे पाहून लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रिक्षाचालकाने केलेले नसते धाडस पाहायला मिळत आहे. रोड्स ऑफ मुंबई या ट्विटर हँडलवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.



या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "व्हिडिओ पाहून असे दिसते की ही घटना पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये घडली आहे. तसेच चालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहितीसाठी आम्ही व्हिडिओचा अभ्यास करत आहोत.