महाड : महाड शहरात दोन महाकाय मगर पकण्यात 'सीसस्केप' या प्राणीमित्र संघटनेला यश आलंय. मगर पकडण्यासाठी लागणारी कोणतीही अद्ययावत साधनं नसताना केवळ परीस्थिती आणि अभ्यासाच्या जोरावर 'सिसस्केप'च्या सदस्यांनी दोन महाकाय मगर पकडण्याचं काम केलंय. या दोन्ही मादी मगरी असून ९ फूट लांबीच्या आहेत. मगर पकडण्याचा हा थरार अनुभवण्यासाठी गर्दी झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाडच्या सावित्री नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मगरी पहायला मिळतात. सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे या मगरी महाड शहरात शिरल्या होत्या. या दोन्ही मगरी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात म्हणजे सावित्री नदीपात्रात सोडण्यात आल्या.