बैलाशी पंगा, असा घेतला शिंगावर आणि आपटला । व्हिडिओ व्हायरल
Bull picked up the person by its horns Video Viral : दिंडोरीच्या पुणेगावमध्ये `आला अंगावर घेतला शिंगावर` या म्हणीचा प्रत्यय आला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नाशिक : Bull picked up the person by its horns Video Viral : दिंडोरीच्या पुणेगावमध्ये 'आला अंगावर घेतला शिंगावर' या म्हणीचा प्रत्यय आला. पोळ्यानिमित्त मारुती मंदिराजवळ बैलाला सलामी दिली जात असतानाच एकाने बैलाशी मस्ती केली, त्यामुळे बैल बिथरला. सैरभैर झालेल्या या बैलाने सलामीसाठी जमलेल्या गर्दीतल्या एका ग्रामस्थाला शिंगावर घेतले आणि आपटले. हा थरार मोबाईलमध्ये चित्रित झाला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मालकाला बैलाने घेतले शिंगावर
दरम्यान, दुसरीकडे भंडाऱ्यात दारुच्या नशेत असलेल्या मालकाला बैलाने शिंगावर घेतले. बैलपोळानिमित्त बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. दारुडा बैलमालक बैलांना खेचत होता. यावेली पाठीमागून बैलाने बैलमालकाल उचलून आपडले. सध्या भंडाऱ्यामध्ये हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
चक्क गाढवांचा पोळा
अकोल्यातील अकोटमध्ये चक्क गाढवांचा पोळा भरला. भोई समाजानं गेल्या 51 वर्षांची परंपरा जपत गाढवांचा पोळा साजरा केला. जवळपास 200 कुटूंबांचा उदरनिर्वाह या गाढवांवर चालतो. त्यामुळे या गाढवांची पूजा करुन त्यांना नैवद्य देण्यात आले.