Video: चक्क टॉयलेटमध्ये बनवली पाणीपुरी ? `या` विक्रेत्याची हिंमत तर बघा
Panipuri Toilet News: आपल्या सगळ्यांना पाणीपुरी खायला आवडते परंतु हल्ली पाणीपुरी खाणं (panipuri) अनेकांच्या जीवावरही बेतू लागलं आहे. काही वर्षांपुर्वी पाणीपूरीच्या पाणीत लघवी टाकत पाणीपुरी विकणाऱ्या विक्रेत्याचा हा घृणास्पद प्रकार जगासमोर आणला होता आता पुन्हा असाच असाच लज्जास्पद प्रकार वाशी येथे घडला आहे.
Panipuri Toilet News: आपल्या सगळ्यांना पाणीपुरी खायला आवडते परंतु हल्ली पाणीपुरी खाणं (panipuri) अनेकांच्या जीवावरही बेतू लागलं आहे. काही वर्षांपुर्वी पाणीपूरीच्या पाणीत लघवी टाकत पाणीपुरी विकणाऱ्या विक्रेत्याचा हा घृणास्पद प्रकार जगासमोर आणला होता आता पुन्हा असाच असाच लज्जास्पद प्रकार वाशी येथे घडला आहे. वाशी रेल्वे स्थानकाच्या टॉयलेटमध्ये चक्क पाणीपूरीचा स्टॉल पाहायला मिळाला आहे. यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे आणि या घटनेचा सगळ्यांकडूनच संताप व्यक्त केला जात आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ (video) सगळीकडे व्हायरल होत आहे. (video viral panipuri seller near vashi railway station sells golgappa in toliet)
तुम्ही आज पाणीपुरी खायला जाण्याचा बेत करतायत मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. ही बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. पाणीपुरी खायला जाण्यापुर्वी ही बातमी नक्की वाचा. तुम्ही जर पाणीपुरी खात असाल तर हा व्हिडीओ पाहा आणि मग ठरवा आणि सावध व्हा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याचं धाडस तुम्हाला अजिबातच होणार नाही.
काय आहे नक्की प्रकार ?
नवी मुंबईतील वाशी स्टेशनच्या टॉयलेटमध्ये पाणीपुरीचा स्टॉल ठेवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा स्टॉल छोटासा असून त्यावर पाणीपुऱ्यातल्या पुऱ्यांचे पॅकेट्स ठेवल्याचे दिसत आहेत. या व्हिडीओत पाणी पुरीच्या पुऱ्या स्पष्टपणे दिसत आहेत. वाशी रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरी ठेवलेली आढळल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एक शीतपेयाची मशीन आणि त्यावर पाणीपुरीच्या पुऱ्या ठेवल्याचं आढल्यानं नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं समोर आलं आहे. परंतु हा स्टॉल इथं (panipuri safety) आलाचं कसा आणि तो कोणी ठेवला, तसेच याचा विक्रेता कोण आहे आणि त्याला हा पाणीपुरीचा माल कोण पुरवत आहे यावर नानातऱ्हेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा पाणीपुरीवाला आहे तरी कोण? ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या पाणीपुरीवाल्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पाणीपुरी खाण्याआधी हा व्हिडिओ पाहा
याआधी असाच काहीसा प्रकार कोल्हापूरातही घडला होता. रंगाळा लेक (kolhapur) परिसरात मुंबई का स्पेशल पानी पुरी वाला असं फलक असणाऱ्या एका पाणीपुरीवाल्यानंही अशाच प्रकारे पाणीपुरीच्या पाणीत टॉयलेटचं पाणी टाकतं असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. समोर आलेल्या माहितीतून असं कळालं की जेव्हा लोकांना हे कळलं तेव्हा त्यांनी अक्षरक्ष: या पाणीपुरीवाल्याचा स्टॉल उडवून लावला होता.
हा व्हिडीओ कोरोना काळात व्हायरल झाल्यामुळे लोकांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारानं लोकांची चिंता वाढली होती. अशाच काही पाणीपुरीवाल्यांवर यापुर्वीही कारवाई करण्यात आली आहे.