बीड : कराड भाजपाचे नेते रमेशआप्पा कराड यांना लातूर-बीडच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट दिलं, मात्र ऐनवेळी रमेशआप्पा कराड यांनी यूटर्न घेतला आणि उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. यावर गोंधळलेल्या राष्ट्रवादीने पुन्हा आपली राजकीय गणित नव्याने चाचपली आणि अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादीने आता अशोक जगदाळे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी असा दावा देखील केला आहे की, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची सुतराम शक्यता नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी जरी अर्ज मागे घेतला, तरी विजय आमचाच असेल, जे काही बोलायचं आहे ते जय-पराजयानंतर बोला, कारण भाजपाच्या उमेदवाराची निवडण्याची येथे सुतराम शक्यता नाही. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना चांगलाच धक्का दिल्याचं बोललं जातं होतं, त्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी काहीही झालं तरी विजय आम्ही पाठिंबा देऊ, त्याच उमेदवाराचा होईल असा दावा केला आहे.


धनंजय मुंडे यांचा दावा हा विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतरच सिद्ध होणार आहे, मात्र तुर्तास तरी भाजपाने राष्ट्रवादीला या निवडणुकीत ऐनवेळी पळापळ करण्याची वेळ आणली आहे.