नागपूर  :  शेतकरी प्रश्नावरुन आणि मुख्यमंत्री यांना उद्देशून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वापरलेल्या नौटंकी शब्दावरून विधानपरिषदेच्या कामकाजाचा पहिला दिवस गाजला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं कर्जमाफी दिलेल्या शेतक-यांची यादी सभागृहात सादर केल्याशिवाय सरकारला कर्जमाफीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असा दावा धनंजय मुंडेंनी केला. शेतकरी समस्यांवर सर्व कामकाज बाजुला ठेवत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र सभापती निंबाळकर यांनी हा प्रस्ताव फेटाळत, 2 मिनिटं बोलण्याची परवानगी धनंजय मुंडेंना दिली. यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री नौटंकी असल्याचा आरोप केला. त्याला सभागृह नेते चंद्रकात पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला. यावरून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये खडाजंगी झाली.


 


3 वेळा कामकाज तहकूब


शेतकरी प्रश्नावरून विरोधकांनी 2 मिनिटं टीका केल्यावर सत्ताधा-यांनाही बोलायला दिले पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र याच मुद्द्यावरून विरोधक -सत्ताधारी यांच्यातील आरोप प्रत्यारोप संपत नसल्याने गोंधळ कायम राहिला. त्यामुळे सभापतींनी सुरुवातीला 3 वेळा कामकाज तहकूब केलं.  त्यानंतर गोंधळ वाढल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं गेलं.