निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : नाशिकच्या कळवण, सटाणा तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आला आहे. गिरणा  धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ४९५२ क्यूसेसवरून १० हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, धरणामध्ये पाण्याची आवक वाढत असल्याने सकाळी ९ वाजता १२ हजार ५०० क्यूसेस तर, साडेनऊ वाजता १५ हजार क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग  वाढविण्यात आला. ११ वाजता थेट २० हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आला. 


पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरण १२ वर्षानंतर तुडुंब झाले आहे. याआधी धरणाच्या एकूण १४ दरवाजांपैकी २ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. आता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.