मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटेंनी 16 जूनपासून आंदोलनाचा इशारा दिला. त्याआधी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणावरून विनायक मेटे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारची निष्क्रियता मराठा समाजाच्यामुळावर आल्याची टीका विनायक मेटेंनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजानं पुन्हा संघर्षासाठी तयार व्हावं असं आवाहन मेटे यांनी केलं. आमचं आंदोलन मूक नसेल तर बोलकं असेल असं म्हणत त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरही टीका केली. नक्षलवाद्यांच्या पत्रामागे दुसराच हेतू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. 


मुख्यमंत्र्याचा दिल्ली दौरा म्हणजे केवळ नाटक आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. मुख्यमंत्र्याचंनी या प्रकरणी वेळीच लक्ष न दिल्यास मराठा समाजातील वंचित नक्षलींच्या कारस्थानाला बळी पडतील असं मेटे म्हणाले.


दुसऱ्याकडे मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून समाजाला वेठीस धरणार नाही अशी भूमीका खासदार संभाजी राजे भोसले यांनी घेतली. मोर्च्याऐवजी 36 जिल्ह्यांमध्ये मूक आंदोलन केलं जाईल आणि 16 तारखेला कोल्हापुरातून त्याची सुरुवात होईल अशी घोषणा त्यांनी औरंगाबादमध्ये केली.


आरक्षणाच्या मुद्द्यावर पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक आज पुण्यात होणार आहे. या बैठकीसाठी विजय वडेट्टीवार, बाळासाहेब सानप बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहेय आरक्षणासाठी ओबीसीही एकवटले असून आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.