आकोला : अकोल्यात आज नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्या. शहरात तहफुज-ए-शरीयते कानून समितीच्या वतीनं अकोला क्रिकेट मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला 20 ते 25 हजार लोक उपस्थित होते. ही सभा संपल्यानंतर जमावानं हिंसक आंदोलन केलं. शहरातील टॉवर चौकात अमित शहांचा पुतळा जाळण्यात आला. यानंतर संतप्त जमावानं टावर चौक ते बसस्थानक चौकादरम्यान दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस महिला आणि पोलीस पुरूष कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. तर एका नागरिकही जखमी झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलक इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी यानंतर वाहनांचीही तोडफोड केली. या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ जवळपास बंद आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.


सीएए आणि एनआरसीला विरोध दर्शविण्यासाठी अकोल्यात जाहीर सभा ठेवण्य़ात आली होती. यावेळी या सभेला हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाज एकत्र आला होता. पण या सभेनंतर सुरु झालेल्या मोर्चादरम्यान हिंसक घटना घडल्या. घोषणाबाजी करत आंदोलकांनी दगडफेक केली.