bahulicha haud news: काशीबाई शाळेत जात होती, म्हणून १८९९ मध्ये पुण्यात तिची हत्या करण्यात आली होती.
काशिबाई म्हणजे सत्यशोधक चळवळीचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले यांची कन्या.डॉ. विश्राम घोले मोठे शल्यविशारद होते.ते माळी समाजातील बडे प्रस्थ, पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते समाज सुधारक होते.महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेउन त्यांनी स्त्रीशिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली.


आपल्या घरातून सुरवात करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली....हिला शिकवण्यास सुरवात केली.लाडाने तिला ‘बाहुली' म्हटले जायचे.


डॉ. घोले साक्षरतेचे कट्टर समर्थक होते, स्त्री शिक्षणाबाबत आग्रही होते.म्हणूनच लाडक्या बाहुलीला त्यांनी शाळेत घातले.अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत बाहुलीच्या शिकण्याला डॉ. घोले यांचे पाठबळ असले तरी समाजातील काही व्यक्तींना त्यांची ही कृती नापसंत होती,


किंबहुना प्रखर विरोध होता.अनेकदा मान्यवरांनी डॉ. घोले यांना समजविण्याचा प्रयत्न केला.बहिष्कृत करण्याची धमकी दिली.पण डॉ.घोले यांनी त्यांना कुठलीही भीक घातली नाही.


शेवटी काही नतद्रष्ट व्यक्तिंनी काचा कुटुन घातलेला लाडु बाहुलीस खावयास दिला..


बिचारी पोर ती काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडली.


 स्त्री शिक्षणाचा पहिला बळी


उद्विग्न झालेल्या तिच्या पित्याने म्हणजे डॉ. विश्राम घोले यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्"बाहुलीचा हौद" बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.


100 वर्षाहून अधिक काळ हा हौद बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ अस्तित्वात होता.


रस्तारुंदीकरणासाठी कोतवाल चावडी १९९५ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली. त्यावेळी बाहुलीची एतिहासिक स्मृती फरासखान्यासमोर हलविण्यात आली.


सध्या अक्षररुपात या हौदावर काशिबाईंच्या आठवणी जतन करुन ठेवल्याचे पहायला मिळतात.


पुस्तक हे शिक्षणाचे प्रतिक असल्याने ग्रंथाच्या आकारातील संगमरवरातील फरशी या हौदावर लावण्यात आली होती.


त्यावर काशिबाईंचा हौद असे लिहीलेले आहे.


साक्षरतेसाठी बलिदान केलेल्या या बालिकेची ऐतिहासिक आठवण भावी पिढीला पाहायला मिळणे कठीण आहे.