रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगलीतल्या हरिपूर भागात उलट रिक्षा चालवण्याच्या स्पर्धेत झालेल्या अपघाताचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय. ही बातमी 'झी २४ तास'ने दाखवल्यानंतर या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उलट रिक्षा चालवताना झालेल्या अपघाताचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय. या स्पर्धेदरम्यान मोटर सायकलवरील दोन युवकांचा अपघात झाला. त्यात दोघेही जखमी झालेत.


सांगलीत अनेक ठिकाणी रिव्हर्स रिक्षा चालवण्याची स्पर्धा पार पडतात. या स्पर्धा विनापरवाना आणि कोणत्याही सुरक्षेविना पार पडतात. त्यामुळे, यापुढे रिव्हर्स रिक्षा चालवण्याची स्पर्धा घेतल्या जाऊ दिल्या जाणार नाहीत तसंच अशा स्पर्धा आयोजित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिलीय.