pankaja munde viral video: संभाजीनगरहून बीड कडे जाताना भाजपच्या नेत्या पंकजा ताई मुंडे  (pankaja munde made tea on tapari) चहाची तल्लप आली आणि मग काय हौसेला मोल नसत म्हणतात ना तसचं काहीस झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निपाणी फाट्यावर पंकजा मुंडे चहाच्या टपरीवर थांबल्या आणि कार्यकर्त्यांनी चहा पिण्याची इच्छा व्यक्त केल्याने स्वतःच्या हाताने चहा बनवून त्यांनी कार्यकर्त्यांना प्यायला दिला.. चहा बनवायला आवडत असल्याचं यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितलं आणि कार्यकर्त्यांसोबत चहाचा आस्वाद घेतला. 


''खूप दिवसांपासून मी चहा बनवला नाही आणि इकडे आले आणि चहा बनवण्याचा मोह आवरू शकले नाही आणि मी स्वतः कार्यकर्त्यांसाठी चहा बनवायला घेतला असं पंकजा ताई मुंडे यांनी राजकारण (politics) आणि चहा यांचं समीकरणसुद्धा सांगितलं.


त्या म्हणाल्या अजय पद्धतीने चहा करण्यासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित पडणं खूप गरजेचं असतं त्याप्रमाणे राजकारणात सुद्धा सर्व गोष्टींचा मेळ बसणंसुद्धा खूप महत्वाचं असतं. इतर पदार्थ बनवणं सोपं आहे पण चहा बनवणं खूप अवघड आहे,असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. 



दरम्यान मला फार स्ट्रॉंग चहाच आवडत असं पंकजा मुंडे म्हणाल्या.. यावेळी जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. दरम्यान देवेंद्र फडणवीसांना कधी चहा पाजला का यावर त्यांनी उत्तर दिल कि अनेकदा त्यांनी फडणवीसांना चहा पाजलाय. अशा अनेक गप्पाटप्पा झाल्या आणि सध्या पंकजा मुंडे यांचा चहाचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.