नाशिक : जंगल सफारीसाठी गेलं असता किमान एक तरी वाघ, बिबट्या दिवासा अशी सर्वांची इच्छा असते. त्यातही हे प्राणी शिकार करताना दिसले, की आपण काहीतरी भन्नाट पाहिल्याचीच भावना मनात घर करुन असते. हा थरार प्रत्यक्षात अनुभवण्याचा योग तसा कमीच येतो. (Viral video Leopard attacked a pet dog in nashik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये असणाऱ्या या जीवांना शिकार करताना पाहणं, अंगावर काटा आणतं. अशीच एक थरारक घटना नुकतीच नाशिकमध्ये घडली. एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विटरवर या घटनेचा व्हिडीओही पोस्ट केला. 


नाशिकमधील मुंगसरे या गावात मानवी वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या आला आणि त्यानं एका घराच्या अंगणात असणाऱ्या पाळीव श्वानावरच हल्ला केला. 


श्वान घराच्या अंगणातील कट्ट्यावर बसलेला असतानाच त्याला बिबट्याची चाहूल लागली आणि तो सैरभैर पळू लागला. पण, त्याचा पळ काढण्याचा प्रयत्न असफल राहिला. 


अखेर बिबट्यानं श्वानाची शिकार केली आणि त्याला जबड्यात पकडून तो आपल्या वाटेनं निघून केला. बिबट्याचा हा व्हिडीओ अंगावर काटा आणत आहे. 



मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणांचा वावर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता नाशिकचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सर्वसामान्य नागरिकांना सतर्क केलं आहे. 



मुंगसरे गावातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घरात रहावं, कारण इथं बिबट्याचा वावर वाढला आहे, नागरिकांनी कायम सतर्क रहावं असं आवाहनही त्यांनी केलं.