Margashirsha Guruvar Kalash Decoration : मार्गशीर्ष हा श्रावण महिन्यानंतर सर्वात पवित्र महिना मानला जातो. 'मासांना मार्गशीर्षो ऽ हम्' या वचनाने भगवद्गीतेत गौरव करण्यात आला आहे. यावर्षी  मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरूवार येत आहेत. कुमारिका आणि सुहासिनी मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करतात. मार्गशिष महिन्यातील दर गुरुवारी नित्यनेमाने न चुकता पूजा अर्चना केली जाते . पूजेची तयारी सुरु होते कलशाला सजवण्यापासून . आजकाल तर बाजारात कलश सजवण्यासाठी बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतात. कलशाला नेसवण्यासाठी रेडिमेड साडी आणि दागिने सगळं काही सहज मिळत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात मिळणाऱ्या या गोष्टी अव्वाच्या सव्वा किमतींनी विकल्या जातात. तरीही काहीजणांना घरच्या घरी कलश सजवायचं असेल तर काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर आपल्याकडे आहे. अश्या काही सोप्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही घरच्या घरी कलश सजवू शकता आणि तेही बाजारात मिळणाऱ्या सुंदर सजावटीप्रमाणे...  (viral video Margshirsh Guruvar Kalash Decoration With Blouse Piece in Marathi)


एक छोटासा पाट घ्या त्यावर प्लेटमध्ये तांदूळ किंवा गहू भरून त्यावर ठेऊन द्या आता या गव्हाच्या किंवा तांदळाच्या प्लेटमध्ये कलश ठेऊन द्या. (kalash decoration)


अशी नेसवा साडी


एक छोटासा ब्लॉउज पीस घेऊन त्याला निऱ्यांप्रमाणे प्लेट्स करा आणि त्याला पिन करून ठेऊन द्या. आता कलशाच्या मधोमध पिन केलेली साडी नारळावरून नेसून घ्या त्याला एका बाजूने निऱ्या सोडत मागील बाजूला घ्या आणि तसेच दुसऱ्या बाजुनेसुद्धा करा, आता मागे आलेला हा घोळ पिनच्या मदतीने बांधून घ्या.. आता समोरील साडी नेसवून तयार,यानंतर दागिने घाला आणि सुंदरपद्धतीने कलश सजवा मुखवटा आणि वेणीने संपूर्ण कलश सजवून घ्या. (saree drapping ideas)


स्वामी माउली (swami mauli youtube channel) नावाच्या युट्युब चॅनेलवर असाच एक साडी नेसवण्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात फारच सोप्या आणि सुंदर पद्धतीने कलशाला सजवण्यात आलं आहे 



चला तर मग या मार्गशीष गुरुवारी देवीचा कलश सुंदररित्या सजवा आणि देवीचा आशीर्वाद तर घ्याच आणि लोकांकडून वाहवा देखील मिळवा (viral video Margshirsh Guruvar Kalash Decoration With Blouse Piece in Marathi)