Viral  Video Communicate With Animals & Plants In Your Language :  एक तरुणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या तुफान व्हयरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी पालीशी संवाद साधल्याचा दावा करत आहेत. तिच्या या दाव्याची सोशल मिडियावर खिल्ली उडवली जात आहे. कमेंटच्या माध्यमातून तिला ट्रोल केले जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही गावाला गेलो होतो. माझ्या आजीच्या घरी.. तेव्हा तिथे एक पाल आली होती. पाल पाहून मी घाबरले. नंतर मी या पालीशी मी संवाद साधला.  तेव्हा ती पाल मला म्हणाली माझी डिलीव्हरी होणार आहे.  तेव्हा मी पालीला म्हणाले ही जागा तुझ्यासाठी योग्य नाही. आम्ही गेल्यावर हे घर बंद होईल. तुला इथे खायला काहीच मिळणार नाही. तुला घरातून बाहेर पडता येणार नाही. तू या घरात अडकून पडशील प्लीज या घरातून जा अशी विनंती मी त्या पालीला केली. पालीने माझं ऐकलं आणि ही पाल निघून गेली. यानंचर परत ही पाल कधीच माझ्या घरी नाही आली असा दावा या तरुणीने केला आहे. 


हे देखील वाचा... भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाब वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? आयुष्य म्हणजे मोठ रहस्य  


सलोनी डोंगरे असे या तरुणीचे नाव आहे.  टेलीपथीक एनिमल कम्यनिकेटर असल्याचा दावा ही तरुणी करत आहे. टेलीपथी म्हणजे सब कॉन्शियस माईंडच्या मदतीने प्राण्यांना जे काही सांगायचे आहे ते फिलिंग आणि व्हिजनच्या माध्यमातुन समोरच्याला सांगते असा प्रकारे मी प्राण्यांसोबत संवाद साधते असा सलोनीचा दावा आहे. 


प्राण्यांना बोलता येत नसले तरी त्यांना भावना असताता. त्यांच्या भावनांच्या मदतीने आपण प्राण्यांशी संवाद साधतो. टेलिपथीच्या माध्यमातून प्राण्यांशी संवाद साधता येतो. अनेकदा प्राण्यांना न भेटता पण मी प्राण्यांशी संवाद साधते. सिक्स सेन्सच्या मदतीने मी प्राण्यांशी संवाद साधते.  प्राण्यांच्या आत्म्याशी कनेक्ट होऊन मी प्राण्यांशी संवाद साधते. प्राण्यांशी संवाद साधताना प्राण्यावर विश्वास आणि स्वत:वर आत्मविश्वास पाहिजे. जेव्हा आपण सब कॉन्शियस मध्ये विचार करतो तेव्हा नैसर्गिकरित्या प्राण्यांशी संवाद साधता येतो. अमेरिकेतील प्राण्यांशी देखील मी व्हिडिओ कॉल तसेच डायरेक्ट सोल टू सोल संवाद साधते. मी सुरुवातीला घरातील झाडांशी बोलून बोलून सराव केला. यानंतर मी सर्व प्रथम माझ्या मित्राच्या कुत्र्याशी संवाद साधला. पुस्तकं वाचून तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून मी प्राण्यांशी संवाद साधायला शिकले. 


ज्यांचे प्राणी हरवतात ते मला संपर्क साधतात. अशा वेळास या प्राण्यांशी संवाद साधून मी त्यांना घरी येण्याची विनंती करते.  प्राणी जखमी असल्यास, किंवा त्यांनी घरी येण्याची इच्छा नसेल तर ते तसेही मला सांगतात. अनेकदा प्राण्यांना कुणीतरी उचलून नेते किंवा किंवा त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्यासह असे काही घडले असल्यास देखील ते मला सांगतात. त्या प्रमाणे मी त्या प्राण्याच्या मालकाला तशी माहिती देते. अनेकदा मी गोल्डन गॉड टेक्निक वापरते.