भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाबा वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? आयुष्य म्हणजे मोठ रहस्य

आपल्या भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाब वेंगाच्या आयुष्यातील खरं सत्य जाणून घेऊया. बाबा वेंगाचे आयुष्य म्हणेज मोठ रहस्य आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 29, 2025, 11:41 PM IST
भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाबा वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? आयुष्य म्हणजे मोठ रहस्य   title=

Baba Vanga: प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा नेहमीच चर्चेत असतात. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने जगाला धडकी भरते. बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे. मात्र, बाब वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? बाबा वेंगाचं आयुष्य म्हणजे मोठ रहस्य  आहे. जाणून घऊया याच रहस्याविषयी. 

बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकिते केली आहेत. यापैकी अनेक भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत. यामध्ये दुसरे महायुद्ध, चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हियाचे विघटन, चेरनोबिल अणुदुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारखेसह अनेक भाकिते खरी ठरली आहेत. वर्ष संपत आलं की नविन वर्षात काय घडले याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. अशातच दरवर्षी बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत येते. या भविष्यवाण्यासह बाबा वेंगाच्या वैयक्तीक आयुष्य देकील चर्चेच येते. बाबा वेंगाविषयीचे सर्वात मोठं सत्य म्हणजे बाबा वेंगा पुरुष आहे की स्त्री यावर नेहमीच वाद विवाद होतात. याबाबत अनेकजण वेगवेगळी मतं मांडतात.

बल्गेरियन  बाबा वेंगा  प्रसिद्ध भविष्यवेत्या आहे. त्यांचे खरे नाव वांगेलिया गुस्ताव पांडव होते. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी स्ट्रुमिका, बल्गेरिया येथे झाला. लहानपणी एका अपघातामुळे त्यांची दृष्टी गेली. मात्र यानंतर भविष्य पाहण्याची ताकद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

बाबा वेंगा यांनी 1990 मध्ये एका मुलाखतीदरम्यान स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. 11 ऑगस्ट 1996 रोजी  मृत्यू होणार असल्याचे  सांगितले होते. बरोबर 11 ऑगस्ट रोजी बाबा वेंगाचे निधन झाले.  पण बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे.

बाबा हा शब्द ऐकून अनेकांचा भ्रमनिरास होतो की बाबा वेंगा हा पुरुष होता. प्रत्यक्षात मात्र  बाबा हा बल्गेरियन शब्द आहे. म्हणजे वृद्ध स्त्री किंवा आजी. हा आदरणीय शब्द आहे. जो तिथल्या संस्कृतीत वृद्ध महिलांसाठी वापरला जातो. त्यामुळे बाबा वेंगा ही एक स्त्री होती.

2025 या वर्षाची सुरुवात विनाशकारी असेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा याने केली आहे. बाबा वेंगा यांनी युरोपमध्ये मोठ्या संघर्ष होईल अशी भविष्यवाणी केली आहे. 2025 पर्यंत युरोप खंडातील बहुतांश लोकसंख्या नष्ट होईल. सध्याच्या भू-राजकीय तणावाचा भविष्यात गंभीर परिणाम पहायला मिळेल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x