COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकावर आरपीएफ कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानाने एका महिलेचे प्राण वाचले. बुधवारी संध्याकाळच्या वेळी मुंबईहुन पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन सुपरफास्ट ही गाडी कर्जत स्थानकात प्रवेश करत असतानाच एक महिला गाडी पकडण्यासाठी रेल्वे ट्रॅक क्रॉस करून प्लॅटफॉर्म वर येण्याचा प्रयत्न करत होती.


क्षणाचाही विलंब न लावता ट्रॅकच्या दिशेने झेप


मात्र तिला गाडीचा अंदाज न आल्याने  हिं महिला डेक्कन क्वीन खाली येऊन तिचा अपघात होणार इतक्यात प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल संतोष कुमार यांनी क्षणाचाही विलंब न लावता ट्रॅकच्या दिशेने झेप घेत महिलेला प्लॅटफॉर्म वर खेचून घेतलं आणि तिचे प्राण वाचवले. 


ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून कॉन्स्टेबलने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे त्याचं कौतुक होतं आहे.