मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : मॉल किवा कपड्यांच्या शोरूममधल्या चेंजिंग रूमपासून आता महिला आणि तरुणींना मुक्ती मिळणार आहे. चेंजिंग रूममधल्या छुप्या कॅमेराची धास्ती अनेक महिलांनी घेतलीय. त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या महाविद्यालयीन तरुणींनी 'व्हर्चुअल ड्रेसिंग रूम'ची निर्मिती केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉल किंवा कपड्याच्या मोठ्या दुकानात जाऊन कपडे खरेदी करायची संकल्पना कितीही छान असली तरी तिथल्या 'चेंजिंग रूममध्ये छुपे कॅमेरा लावलेले नाहीत ना?' याची धास्ती नेहमीच महिलांना असते. चेंजिंग रूममधलं चित्रीकरण करून त्याचा गैरवापर केल्याचे संतापजनक प्रकार अनेकदा घडलेत. त्यावर उपाय शोधलाय नाशिकच्या महावीर इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी...


महिलांच्या सुरक्षेसंदर्भात त्यांनी एक प्रोजेक्ट बनवलाय. या विद्यार्थिनींनी एक 'व्हर्चुअल ड्रेसिंग रूम' नावाने एक सॉफ्टवेअर तयार केलंय. या सॉफ्टवेअरसमोर उभं राहिल्यावर आपल्याला कोणता ड्रेस कसा होतो? हे डिस्प्लेवर पाहायला मिळेल. त्यामुळे प्रत्यक्षात चेंजिंग रूममध्ये जाण्याची गरजच राहणार नाही. 


अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनींनी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून हा प्रकल्प बनवलाय. त्यामुळे सध्या तरी त्यांचा हा प्रोजेक्ट महाविद्यालया पुरताच आहे. मात्र लवकरच या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून त्याचं पेटंट घेण्याची आणि शहरातल्या मॉलमध्ये आणि एखाद्या कपड्याच्या दुकानात हे इन्स्टॉल करण्याची मागणी आहे. 


प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींनी 'व्हर्चुअल चेंजिंग रूम' तयार करून समाजकंटकांचे मनसुबे उधळून लावले जातील याचं प्रात्यक्षिक सादर केलंय. त्यामुळे तरूणींसाठी हा मोठा आधार आहे. जागेच्या कमतरतेमुळे किंवा महिलांच्या सुरक्षिततेसाठी भविष्यात असे व्हर्चुअल ड्रेसिंग रूम प्रत्येक शोरूममध्ये दिसतील ही अपेक्षा