कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई :  विटावा शांताराम नगर , सूर्यनगर येथील ठाणे महानगरपालिकाच्या मलनिःसारण केंद्राला भीषण आग लागल्याने परीसरातील रहिवाश्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सदर आगीचे स्वरुप प्रचंड भीषण असल्याने आणि  मलनिःसारण केंद्र हे रहिवाशी परीसराच्या लगत असल्याने परीसरात आग पसरण्याचे संभाव्य परीस्थिती निर्माण झाली होती.  रहिवाश्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला होता.



 


ठाणे महानगरपालिका अग्निशामक दल आणि नवी मुंबई अग्निशामक अग्निबंबाच्या चार गाड्या मागवून आग विझवून परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली .


 सदर मलनिःसारण केंद्रात ठेवल्या जाणाऱ्या ज्वलनशील द्रव्याच्या (सामग्रीच्या) योग्य त्या प्रकारे काळजी अथवा निगा देखभाल न केल्याने सदर भीषण आगीचे स्वरुप आले तरी ठाणे महानगरपालिकेने सदर विषयी त्वरीत दखल घ्यावी. तेथील स्थानिक रहिवाशांच्या जीवितास  धोका निर्माण होणार नाही या बाबत  पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.