पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची आषाढी एकादशीनिमित्त पहाटे भक्तीमय वातावरणात महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घातले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली. पांडुरंगा भरपूर पाऊस पडू दे.  देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे, असे  मुख्यमंत्री यांनी विठ्ठलाकडे साकडे घातले. तसेच कर्जमुक्त करता यावे यासाठी विठ्ठलाकडे मागणी केली आहे,  मंदिर समिती अपूर्ण लवकरच पूर्ण करणार, असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा परसराम उत्तमराम मेरत आणि त्यांच्या पत्नी अनुसया मेरत यांना मिळाला. शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभरातचा मोफत पास व १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.



यावेळी स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले, गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रवीण दराडे, शकुंतला नडगिरे, उल्हास पवार, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख एस़ वीरेश प्रभू, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, गायिका अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते़