भिवंडी महानगरपालिका अंतिम निकाल  (९० जागा)


काँग्रेस - ४७


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप - १९


शिवसेना - १२


राष्ट्रवादी - ०


मनसे - ०


कोणार्क - ४


एमआयएम- ०


रिपाई - ४


समाजवादी - २


अपक्ष - २   


- दुपारी १.२५ : प्रभाग क्रमांक २३ मधील विजयी उमेदवार 


अ. निलेश चौधरी, भाजपा


ब. हनुमान चौधरी, भाजपा


क. अस्मिता चौधरी, भाजपा


ड. योगिता पाटील,  भाजपा


- दुपारी १.१५ : प्रभाग क्रमांक ४ मधील चारही विजयी उमेदवार काँग्रेसचे 


अ. मंगला भामरे, काँग्रेस


ब. राजिया बेगम मजीद, काँग्रेस


क. नंदकुमार सावंत काँग्रेस


ड. अब्दुल अजीज सत्तार, काँग्रेस


- दुपारी १२.५० : भाजप ११, काँग्रेस १७, राष्ट्रवादी १, शिवसेना ११, कोणार्क ४, रिपाई ४, अपक्ष १, समाजवादी ५ जागांवर आघाडी


भिवंडीचा योगी

- दुपारी १२.४० : भिवंडीच्या योगीचा पराभव... सेनेचे महापौर तुषार चौधरी यांनी ९१ मतांनी केला पराभव


- दुपारी १२.३० : प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजप पॅनल विजयी


अ. नंदिनी महेंद्र गायकवाड


ब. मिना बालकिशन कल्याडप


क. संतोष शेट्टी 


ड. सुमित पाटील 


सुमित पाटील हे भाजप खासदार कपिल पाटील यांचे पुतणे तर संतोष शेट्टी भाजप भिवंडी शहर अध्यक्ष


- दुपारी १२.२० : प्रभाग क्रमांक १८ मधले विजयी उमेद्वार


अ. कामिनी रवींद्र पाटील, भाजप


ब. दर्शना अमित गायकर, भाजप


क. शाहिन सिद्दिकी, भाजप


ड. सुहास नकाते, भाजप


उल्लेखनीय म्हणजे, प्रभाग १८ हा मुस्लिमबहुल प्रभाग असतानाही पूर्णपणे भाजपचं पॅनल निवडून आलंय... हा भाजप आमदार महेश चौगुले यांचे निकटवर्तीय आणि पसंतीच्या पॅनलचा विजय मानला जातोय.


- दुपारी १२.१० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतलेल्या प्रभागात सेनेची सरशी... प्रभाग क्रमांक २१ मध्ये शिवसेनेच्या पॅनलची निवड... 


- दुपारी १२.०० : प्रभाग क्रमांक १ कोणार्क विकास आघाडीचे सविता खोलेकर आणि नितीन पाटील विजयी


- सकाळी ११.५८  : प्रभाग क्रमांक १ ड मधून कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील विजयी


- सकाळी ११.५५  : प्रभाग क्रमांक १ ब मधून कोणार्क विकास आघाडीच्या माजी महापौर प्रतिभा विलास पाटील विजयी


- सकाळी ११.५०  : प्रभाग २१ मध्ये शिवसेना पॅनल विजयी


अ. अशोक भोसले


ब. वंदना काटेकर


क. अलका चौधरी


ड. मनोज काटेकर


- सकाळी ११.४० : प्रभाग क्रमांक १६ मधल्या ३ जागा भाजपकडे तर एका जागेवर अपक्ष 


- सकाळी ११.१८ : प्रभाग क्रमांक २ मधून माजी महापौर आणि काँग्रेसचे उमेदवार इमरान वली मोहमद खान विजयी


- सकाळी ११.१० : काँग्रेस ७, भाजप ६, शिवसेना ८, एनसीपी १, सपा ०, अपक्ष - १ कोणार्क - ४ जागांवर आघाडीवर


- सकाळी १०.५५ : प्रभाग क्रमांक. १६ मध्ये शिवसेना आघाडीवर 


- सकाळी १०.५० :प्रभाग क्रमांक. २१ मध्ये शिवसेना आघाडीवर 


- सकाळी १०.४५ : प्रभाग क्रमांक. १७ मध्ये शिवसेना - भाजपमध्ये जोरदार लढाई 


- सकाळी १०.३० : भाजप १०, काँग्रेस ११, राष्ट्रवादी ५, शिवसेना ५, कोणार्क ४, रिपाई १, अपक्ष १ जागांवर आघाडीवर 


- सकाळी १०.०० : भिवंडी महापालिका निवडणूक : मतमोजणीला सुरुवात


भिवंडी : निजामपूर महापालिकेसाठी आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  मिल्लतनगर, भादवड, कामतघर, धोबीतलाव, कोंबडपाडा आदी ठिकाणच्या आठ निवडणूक केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.


मतमोजणीवेळी शहरात तीन पोलीस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, १६० सह किंवा उप निरीक्षक, २१२० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, एसआरपीएफच्या तीन कंपन्या, क्युआरटी, वज्र वाहन आणि आरएएफचा बंदोबस्त असेल. तर मतमोजणीच्या आठही  ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच  २६ तारखेला पालिकेचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.