Ajit Pawar Baramati :  उपमुख्यमंत्री अजित पवार वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, सालगडी केले का मला ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.  बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले. 


या कार्यक्रमात भाषण करत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिली जात होते. अनेक जण अजित पवारांना निवदेन देत होते. अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते. मात्र, याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचं म्हटलं. त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही तसंच म्हटलं. यानंतर अजित पवार यांचा संयम तुटला आणि ते संतापले. 


अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर आपला संताप व्यक्त केला. अजित पवार यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 
संतोष देशमुख हत्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धस यांनी केलीये. तसेच पुण्यातील सभेत अजित पवारांवर केलेल्या टीकेवर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.