नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेसाठी उत्साहात मतदान झालं. इगतपुरी नगरपरिषदेच्या ९ प्रभागातल्या १८ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 


त्र्यंबक नगरपरिषदेच्या ८ प्रभागातल्या १७ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आणि थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ठिकाणी आज मतमोजणी होणार आहे.