सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड
नाशिकमधील खून, खंडणीसह अनेक गुन्ह्यातील मास्टरमाइंड व्यकटेश मोरे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी आज धिंड काढली.
नाशिक : नाशिकमधील खून, खंडणीसह अनेक गुन्ह्यातील मास्टरमाइंड व्यकटेश मोरे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी आज धिंड काढली.
व्यंकटेश मोरेनं ज्या भागात आपली दहशत माजवली होती त्याच परिसरात त्याची धिंड काढल्यामुळे इथल्या नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय.
रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ भागात पोलिसांनी व्यंकटेश मोरेला बेड्या घालून फिरवल्यानं नागरिकांमधली भीती कमी झालीय.