लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणी पाठोपाठ मुस्लिम, धनगर समाज आपल्या आरक्षणाची मागणी करत असताना आता वडार समाजानंही आपल्या समाजाचा समावेश 'एसटी' (अनुसूचित जमाती) प्रवर्गात करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या भटक्या जातीमध्ये वडार समाजाचा समावेश आहे. मात्र कर्नाटकमध्ये वडार समाज हा 'एससी' (अनुसूचित जाती) प्रवर्गात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वडार समाजाचा समावेश 'एसटी' (अनुसूचित जमाती) प्रवर्गात केला जावा अशी जुनी मागणी आहे.


वडार समाजासाठी नेमलेले जुने आयोग आणि त्यांचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी, यावेळी वडार समाजाच्या नेत्यांनी केली आहे. या मागणीवर समाजाचा राज्यव्यापी मेळावा लवकरच सोलापूरमध्ये घेणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं.


जर सरकारने वडार समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर येत्या काळात तीव्र आंदोलनाचा इशारा वडार समाजाच्या नेत्यांनी लातूरमधील मेळाव्यात दिलाय.