ठाणे : सोमवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळीही मुसळधार पाऊस सुरुच आहे. ठाण्यात सकाळीच एक दुर्दैवी घटना घडलीय. ठाण्यात ३० फुटी भिंत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झालाय. या घटनेत तरुणाची पत्नी आणि १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालेत. 


या घटनेचं वृत्त समजताच फायरब्रिगेडच्या गाड्या आणि मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यात.