वाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप
वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. पण त्याच्या या शरणगतीमागं काळंबेरं असल्याचा संशय विरोधकांना आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती. सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय.
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. पण त्याच्या या शरणगतीमागं काळंबेरं असल्याचा संशय विरोधकांना आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती. सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय.
वाल्मिक कराडच्या शरणागती घडवून आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. धनंजय मुंडेंनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांच्या भेटीत काय चर्चा झाली त्याचा तपशील जाहीर करण्याची मागणी संभाजीराजेंनी केलीय.वाल्मिकच्या प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.वाल्मिकच्या शरणागतीवर विरोधकांच्या अनेक शंका आहेत. या शंकांचं निरसन झाल्याशिवाय विरोधक शांत बसणार नाहीत याचे स्पष्ट संकेत मिळालेत.
देशमुख कुटुंब दहशतीमध्ये असून त्यांना तातडीनं सुरक्षा पुरवावी. अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलीये.. तर वाल्मिक कराडचे फोन कॉल तपासण्याची मागणी त्यांनी केलीय. वाल्मिक कराडला अटक झाली असती तर समाधान वाटलं असतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कराडच्या आत्मसमर्पणावर दिलीय.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. याबाबत शिवसेना UBT चे नेते मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केलंय. एक्स पोस्ट करत त्यांनी अभिनंदन केलं.
वाल्मिक कराड CIDला शरण आल्यानंतर संतोश देशमुख यांच्या भावानं पहिली प्रतिक्रिया दिलीये.. सरकारनं इतर आरोपींनाही अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलीये.. सरकार या प्रकरणात कारवाई करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.