मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा: आपण प्रत्येकजण समाजाचे देणे लागतो. कृतज्ञता म्हणून आपण सामाजिक भान राखायला हवे. अशीच कृतज्ञतेची भावना ठेवलेल्या 14 वर्षीय ऋत्वीजाचं सगळीकडे कौतुक होतंय. त्याला कारणही तसंच काहीसं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ध्यातील ऋत्वीजाचं सध्या सगळेच कौतुक करत आहेत. कारण, ऋत्वीजाने वयाच्या १४ व्यावर्षीच समाजकार्याला सुरूवात केली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या शिकणाऱ्या ऋत्वीजा मंगेशी मून हिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. ऋत्विजाने स्वत:चे केस दान केले आहेत. ऋत्वीजाने हे केस कॅन्सर पीडितांच्या विग तयार करण्यासाठी दान केलेत. 


ऋत्वीजा ही पारधी समाजातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या मंगेशी मून यांची कन्या आहे. कॅन्सर पीडिताचं दु:ख समजून तिनं, आईच्या पावलावर पाऊल टाकत केस दान केले करण्याचा निर्णय घेतला.


अनेक कार्यक्रमांमध्ये कॅन्सरग्रस्तांना केस दान करण्याबाबत मी ऐकलं होतं. पण, ते कधी प्रत्यक्षात आणू शकणार याबद्दल जरा साशंकता होती. मात्र, ऋत्विजाने आईजवळ इच्छा व्यक्त केली आणि मार्ग सापडत गेला. तिने सगळी माहिती घेऊन, पार्लरमध्ये सगळे केस कापून चेंबूरच्या एका फाउंडेशनमध्ये कुरिअर करून पाठवून दिले.


ऋत्विजाच्या समाजकार्याची सुरूवात तर, अगदी लहान वयात झाली आहे. केस काढल्यावर समाज काय म्हणेल याची पर्वा न करता तिने उचलेलं हे पाऊल कौतुका,स्पद आहे. 'वयाच्या 14 व्या वर्षीच मला ऋत्वीजाची समाज कार्याला मदत झाली आहे. यामुळे मला खूप समाधान मिळाल्याचं', ऋत्वीजाची आई मंगेशी मून सांगतात. शाळेत जाणाऱ्या १४ वर्षीय मुलीचे हे कार्य सगळ्यासाठी प्रेरणादायी आहे. ऋत्वीजाने हिम्मत करून केस दान केले, आणि आपल्या समजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.