मिलिंद अंडे, झी मीडिया, वर्धा : वर्ध्यात (Wardha News) वाढदिवसाचा केक (birthday celebration) कापतांना बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागलीय. वर्ध्याच्या सिंदी मेघे येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागतानाचा EXCLUSIVE विडिओ ZEE 24 तासच्या हाती लागला आहे. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हा तरुण रविवारी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत केक कापत होता. केक कापताना स्प्रे तोंडावर मारताना फायर गनमधून ठिणगी पडल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये वाढदिवस असलेला तरुण किरकोळ जखमी झाला असल्याचं सांगितलं जातं आहे. या घटनेनंतर लगेचच जखमी तरुणाला वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तरुणाच्या कानाला आणि नाकाला किरकोळ जखम झाली आहे. यासोबत तरुणाचे थोडे केस ही जळाले असल्याचं सांगितलं जातं आहे. आगीवर वेळीच नियंत्रण आल्याने या तरुणाचे तोंड जळता जळता थोडक्यात वाचले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढदिवस साजरा करताना केक कापल्यानंतर तरुणाच्या चेहऱ्यावर त्याच्या मित्रांनी स्प्रे फवारला. त्यानंतर फायर गन मधून उडालेल्या ठिणगीमुळे तरुणाच्या चेहऱ्याला आग लागली. चेहऱ्यावर आग लागल्याने तरुणाचा चेहरा जळाला. मात्र त्याचा जीव वाचला आहे. लोक सहसा वाढदिवस साजरा करण्यासाठी या स्प्रेचा वापर करतात. या स्प्रेमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असल्याने ते ज्वलनशील आहे. त्यामुळे हे स्प्रे वापरताना काळजी घ्यायला हवी.


दरम्यान, लग्नसमारंभ आणि वाढदिवसाच्या पार्टीत वापरले जाणारे स्प्रे अत्यंत ज्वलनशील असतात. त्याच्या ज्वलनशीलतेचे कारण म्हणजे त्यात वापरलेले अल्कोहोल. अल्कोहोल हे ज्वलनशील रसायन असल्याने ते अनेक प्रकारे वापरले जाते. त्याचप्रमाणे स्प्रे बनवण्यासाठीही त्याचा वापर होतो. वर्ध्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणावरही अशीच फवारणी करण्यात आली, त्यामुळे आग लागली. आगीमुळे तरुणाचा जीव संकटात सापडला होता.


काय काळजी घ्याल?


लग्न किंवा कोणत्याही पार्टीच्या प्रसंगी असे स्प्रे वापरताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे. याचा वापर करताना सावधगिरी बाळगली नाही तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. या प्रकारचे स्प्रे वापरताना, लक्षात ठेवा की आजूबाजूला कुठेही आगीचा स्त्रोत नाही. जवळपास कुठेतरी आग लागल्यास अशा प्रकारचे स्प्रे वापरणे टाळा. डोळा हा संवेदनशील अवयव असल्याने अशा प्रकारच्या स्प्रेची फवारणी एखाद्याच्या डोळ्यात करू नये.