मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : जिल्ह्यातल्या सालोड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांपासून दारु लपवण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांनी चक्क देव्हाऱ्यातच दारू लपवून ठेवल्याचं समोर आलं आहे. महिला दारूविक्रेत्याची ही हायटेक कल्पना बघून पोलीसही चक्रावून गेले आहेत.  वर्धा जिल्ह्याच्या सालोड  गावातील एक महिला दारूविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या महिलेच्या घरावर अनेकवेळा छापाही टाकला. पण त्या महिलेच्या घरात कोणतीचा पुरावा सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांना प्रत्येकवेळी रिकाम्या हाताने परतावं लागत होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देव्हाऱ्याखाली दारूचा साठा
पोलिसांना त्यांच्या खबरींकडून ठोस माहिती मिळाली. त्या आधारे त्यांनी पुन्हा एकदा त्या महिला दारू विक्रेत्याच्या घरावर छापा टाकला. महिला दारु विक्रेतीची आयडीया पाहून पोलिसही हैराण झाले. अवैध धंदे करणारे व्यावसायिक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी नवनविन शक्कल शोधून काढतात. असाच प्रकार या महिलेनेही केला होता. 


वर्धा लगत असलेल्या सालोड हिरापुर इथं महिला दारू विक्रेत्यानी पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क देव्हाऱ्याखालीच एक बॉक्स तयार केला. त्यात देशी विदेशी दारुच्या बाटल्या लपवण्यात आल्या होत्या. कोणालाही संशय येऊ नये म्हणून या महिलेने देवघराला लाईटिग करून सजवलं होतं. महिलेच्या घरावर पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा त्यावेळी हा सर्व प्रकार उजेडात आला. संपूर्ण दारू साठा जप्त करून त्या महिलेवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.