वर्धा : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर केलं असताना या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. वर्ध्यामध्ये एकाच दिवसात ५५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी रेल्वे स्टेशन, आर्वी नाका, शिवाजी चौक, विक्रमशिला नगर, सिविल लाइन या परिसरात पोलिसांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई केलीये. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांची ही कारवाई सुरु असून मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकूण ११० जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकडाऊनच्या काळात मॉर्निंग वॉक कारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज 27,500 रुपये मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांकडून पोलिसांनी दंड म्हणून वसूल केले.


रविवारी सेवाग्राम परिसरात २९ लोकांकडून ५०० रुपये प्रमाणे १४५०० रुपयाचा दंड वसूल तर तीन दिवसा अगोदर ही 26 लोकांवर कारवाई  करण्यात आली होती. आजपासून जिल्ह्यात कठोर कारवाई सुरु झाली आहे.


जिल्हा प्रशासनाने आता दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. 


1) मॉर्निंग वॉक व विनाकारण घराबाहेर फिरणे- 500 रुपयाचा दंड आणि फोटो काढून प्रसिद्धी


2) सकाळी 7 ते 2 विनाकारण दुचाकीने फिरणे- 500 रु. दंड


3) मास्क न घालता फिरणे - 200 रु दंड


4) दुपारी दोन नंतर दुचाकीने घराबाहेर पायदळ किंवा दुचाकीने फिरल्यास - 500 रु दंड आवश्यकता असल्यास फौजदारी गुन्हा दाखल


5) शहरात ट्रिपल सीट फिरणे - 500 रु दंड आणि दुचाकी जप्त