मिलिंद अंडे, झी 24 तास, वर्धा : महाराष्ट्रातील कार अपघातात 7 भावी डॉक्टर गमावले. त्यानंतर मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. वर्ध्यातील मन सून्न करणारा हा अपघात होता. ज्यामध्ये 7 भावी डॉक्टरांना गमवालं होतं. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या भावी 7 डॉक्टरांचा अपघात कार रेसिंगमधून झाला असावा असं सांगितलं जात आहे. याचं कारण म्हणजे अपघातापूर्वीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात होण्यापूर्वी गाडीमधून तो व्हिडीओ शूट करण्यात आल्याच समोर आलं आहे. देवळी तालुक्यात असलेल्या इसापूर हॉटेलमधून 7 भावी डॉक्टर जेवण करून बाहेर पडले. सर्वांचा मजामस्ती करण्याचा मूड होता. गाडी वेगात चालवताना व्हिडीओ समोर आला आहे. 



जेवण केल्यावर गाडी चालवितांनाचा व्हिडीओ समोर आला आहे.  हा व्हिडीओ पवन जैस्वालच्या इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर ठेवण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये एक जण गाडी हळू चालव असं सांगतानाही दिसत आहे. 


या व्हिडीओमध्ये गाडीचा वेग खूप जास्त असल्याचं दिसत आहे. समोर वेगानं जात असणाऱ्या काळ्या fortune सोबत या तरुणांनी रेसिंग लावल्याचीही चर्चा आहे. हा व्हिडीओ अपघातानंतर 6 दिवसांनी समोर आला. 


कार रेसिंगचा नाद जीवावर बेतला का? असा प्रश्न आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पडला आहे. जेव्हा गाडीचा अपघात झाला तेव्हा वेग 140 असल्याची माहिती मिळाली होती. बर्थडे पार्टी आणि रेसिंगची मजा जीवघेणी ठरल्याची चर्चा होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यूने बसला होता अख्ख्या देशाला हादरा