देहू : जून महिना उजाडला की आषाढी एकादशीचे अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात. उद्यापासून महाराष्ट्राच्या आनंदवारीला सुरुवात होत आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी ही उद्या देहूहुन प्रस्थान ठेवेल. तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत सहभागी होणा-या वारकरी आणि दिंड्यानी देहू गजबजून गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उद्याचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असणार आहे. तर आळंदीत हीवारक-यांची गर्दी सुरु झालीय. संत ज्ञानेश्वरांची पालखी शनिवारी पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल. 


संत ज्ञानेश्वरांचा मुक्काम हा शनिवारी आळंदीमध्ये आपल्या आजोळी म्हणजेच गांधीवाड्यात असेल. गावोगावाहून निघालेल्या दिंड्या पताका आणि पालख्या या आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ व्हायला सुरुवात झाल्याने सगळं वातावरण विठ्ठलमय झालं आहे.