ठाणे : अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळांना दिनांक 14 आणि 15 जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून त्याच पार्श्वभूमिवर प्रशासन आता सतर्क झालं आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे नदी-नाले भरुन वाहत आहेत. सखोल भागात पाणी साचलं आहे.



विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांना ही गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


याआधी पुणे, नवी मुंबई, वसई-विरार येथील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.