यवतमाळ : मुंबईतील एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृत आणि कीटकनाशक फवारणीत मृत शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारनं दुजाभाव केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय. कीटकनाशक फवारणीत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीआधी १०  लाख रुपये मदत जाहीर न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी करु असा इशाराही कडू यांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय हे मृत्यू अपघात नसून यांत दोष यंत्रणेचा असल्याचा आरोपही कडू यांनी केलाय. दोषी अधिका-यांवर कडक कारवाईची मागणीही त्यांनी केलीय. कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनाही इशारा दिलाय.