Washim Crime : वाशिम हादरलं! वारंवार विनंत्या करुनही ऐकलं नाही मग... प्रेमी युगुलाच्या कृत्याने एकच खळबळ
Washim Crime News : वाशिमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या प्रेमाला होत असलेला विरोध पाहून प्रेमी युगुलाने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं दोन्ही कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Crime News : वाशिम (washim crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशिमच्या मालेगाव (malegaon) तालुक्यातील उमरदरी येथील जंगलसदृश्य परिसरात प्रेमी युगुलाने एकत्रच आपली जीवनयात्रा संपवली आहे. जंगलाच्या परिसरात झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. मात्र आता दोघांनीही आत्महत्या केल्याचे समोर आल्याने दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी (Washim Police) घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही मृत वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होते. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र त्यांच्या प्रेमाला दोघांच्याही कुटुंबियांकडून विरोध होता. यामुळे दोघेही तणावाखाली होते. शेवटी प्रेमाला होत असलेला विरोध पाहून त्यांनी घर सोडलं आणि एकमेकांसोबत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.
गेल्या काही दिवसांपासून दोघेही घरातून गायब होते. कुणालाही काहीत न सांगता दोघांनीही घर सोडले होते. मात्र दोघेही घरातून निघून गेल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. कुटुंबियांनी दोघेही पळून पुण्याला गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरु केला होता. मात्र बुधवारी सकाळी अचानक दोघांचेही मृतदेह मालेगाव तालुक्यातील उमरदरी येथील जंगलांत आढळून आले. दोघांनीही झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी आधीच आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच दरम्यान, वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदानासाठी पाठवले. दोघांचेही मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जऊळका पोलीस या प्रकरणाचा करत आहे.
रस्ते अपघातात चौघांचा जागीच मृत्यू
दरम्यान, मालेगाव तालुक्यातील मालेगाव – मेहकर रस्त्यावरील वडप येथे खासगी बसने ट्रकला जोराची धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. जखमींवर प्राथमिक उपचार करून काही गंभीर जखमींना वाशिम जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे