Ashok Hande Sion Aaya Song: मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे मुंबई लोकल. लोकलमधील गर्दी हे तर आता मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. असंच मुंबई आणि मुंबईकरांवर एक गाण देखील रचण्यात आलं आहे. एलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात सायन आया सायन आया असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ऐकून अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत सायन आया सायन आया दादर माटुंगा सायन आया हे गाणं गात आहेत ते मराठीतील लोकप्रिय नाटककार व अभिनेते अशोक हांडे आहेत. बॉलिवूडमधील लोकप्रिय गाणे सायोनारा या गाण्याच्या चालीवर हे गाणे बसवण्यात आले आहे.  अशोक हांडे यांचा हा जुना व्हिडिओ पाहून अनेकांना लोकलच्या व त्यांच्या जुन्या मुंबईच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. आम्ही नाटककार या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 


अशोक हांडे यांचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. अगदी गमतीशीर असलेल्या गाण्यात मुंबईची लाइफलाइन आणि स्थानकांची नावंही घेण्यात आली आहेत. अशोक हांडे यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर, आत्तापर्यंत 32,210 जणांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. तर, युजर्संनी अनेक कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहलं आहे की, हे गाणे कधीच जुने होणार नाही. तर, एकाने म्हटले आहे की, लहानपणी ऐकलं होतं हे गाणं पण आज याचा अर्थ समजला खूप दिवसांनी कारणे तेव्हा एवढे स्टेशन पाठ नव्हते. तर, हे गाणे कधीच जुने होणार नाही, असं एका युजरने म्हटलं आहे.  



अशोक हांडे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या गाण्याचा उल्लेख केला होता. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, हे गाण रचून 30 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण आजही मी जिथे जातो तिथे लोकांना अजूनही सायन आया हे गाणं म्हणण्याचा आग्रह करतात. कारण ते त्यांच्या मनाला भिडणारे आहे. मी गाण्यात ज्या समस्या मांडल्या आहेत त्या समस्या त्यांना रोड भेडसावतात. त्यामुळं हे गाणं त्यांना हृदयाजवळचे वाटते व ओळखीचे वाटते. लोकांना हे गाणं आवडते आणि मी ते गातो तेव्हा अधिक हसतात.


अशोक हांडे हे मराठी नाटककार, अभिनेता पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक आहेत. त्यांच्या चौरंग या संस्थेतर्फे ते लोककला व नाट्यकलेला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. महाराष्ट्राच्या वेगेवेगळ्या जिल्ह्यातील व प्रांतातील, संस्कृती जगापुढे आणण्यासाठी त्यांनी सुरुवातीला मंगलगाणी दंगलगाणी नावाचा मराठी ऑर्किस्ट्रा होता. त्यांचा हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. आता त्यांचा मराठी बाणा नावाचा कार्यक्रम देखील खूप लोकप्रिय आहेत.