भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात रात्रीपासून पड़त असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलेय. नदीनाका परिसरात सुमारे ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे महापालिकेचे नालेसफाई झाल्याचे दावे वाहून गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदमानगर , कमला हॉटेल , सिटीझन हॉस्पिटल , सुभाष नगर , ईदगाह या परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने एकाच हाहाकार उडाला आहे. भिवंडी शहरालगतच्या शेलार , खोणी ग्रामपंचायत हद्दीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. 


शहरात मुसळधार पाऊस पडत असताना शहरालगतच्या कामवारी नदीतील पाण्याची पातळी वाढत जात असल्याने खोणी ग्रामपंचायत येथील ग्रामीण भागाला जोडणारा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद होऊन पलीकडे जाण्यासाठी नागरिकांना लांब वरील दुस-या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भिवंडी महानगरपालिकेचे व तहसीलदार कार्यालयाचे आपत्कालीन कक्ष कुठेच मदतीसाठी दिसून आले नाहीत.