औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न सुटता सुटत नाहीये. तोवरच आता औरंगाबाद महापालिकेसमोर नवा प्रश्न उभा ठाकलाय. जलशुद्धीकर प्रकल्पाचा कर थकल्यामुळे या प्रकल्पाची मालमत्ताच जप्त करण्याची नोटीस ग्रामपंचायतीने महापालिकेला दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, बिडकीन ग्रामपंचायतीच्या परिसरात फारोळा गावात महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. याचा मालमत्ता कर महापालिकेनं भरलेला नाही. या प्रकल्पाच्या सुरूवातीपासूनच हा कर थकवलेला आहेय. याबाबत महापालिकेला ग्रामपंचायतीकडून वारंवार नोटीसही बजावण्यात आल्या.  मात्र, उत्तर न दिल्यानं अखेर आता ग्रामपंचायतीनं मालमत्ता जप्तची नोटीस बजावलीय.


७ दिवसात कराचे १६ कोटी भरले नाही तर इमारत जप्तीची कारवाई होऊ शकते.  त्यामुळं या ठिकाणाहून होणारा औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठाही बंद होऊ शकतो.