कोयना : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायमच राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धरणात आता 56.42 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वार्षिक सरासरीच्या कार्यकाळात 45% पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोयना धरण ऑगस्ट महिन्यात पूर्णक्षमतेने भरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा  आणि महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली.