नागपूर : नागपूर विधानभवनाच्या परिसरानंतर आता मंत्र्यांचे बंगले असलेल्या रवीभवन परिसरातही पाणी मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले आहे. अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांमध्येही पाणी शिरलंय.  सामान्यांच्या घरात पाणी शिरणं या बातम्या आपण नेहमीच एकतो पण आजा मंत्र्यांच्या बंगल्यात पाणी गेल्याचीही बातमी आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यांमध्येही पाणी शिरलं. 


नागपुरात गेल्या कित्येक वर्षात इतका पाऊस कदाचित झाला नसेल. यंदाच्या पावसानं सामान्य नागपुरकरांचीच नाही तर अधिवेशनासाठी गेलल्या सगळ्याच मंत्र्यांची त्रेधातिरपिट उडवली.