जोरदार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी
सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय.
वसई : सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय.
वर्सोवा पुलापासून मुंबई आणि वसईच्या दिशेला वाहनांच्या ६ ते ७ किमीच्या रांगा पाहायला मिळतायत. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होतायत.