विकास भोसले, झी मिडीया, सातारा : दुष्काळ निवारण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना सुरु केली. राज्यातील अनेक गावं यामुळे पाणीदार झाली.. मात्र महाबळेश्वर यापासून वंचित राहिलं.. समुद्र सपाटीपासुन ४५०० फूट उंचीचर असलेल्या महाबळेश्वर मध्ये ४ महिन्यात ७ हजार मिमी पाउस पडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याला राज्यातलं चेरापुंजी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. कारण या तालुक्यात सर्वाधिक पाऊस होतो.. पाचगणी परिसरात ७ हजार मिमी पावसाची नोंद होते.. मात्र हे सारं पाणी वाहून जातं.. आणि अनेक गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसतात.. यावर उपाय म्हणून रोटरी क्लब आणि ग्रामस्थांनी वनबंधारे पुर्नजीवन ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केलीये.. 


महाबळेश्वर तालुक्यातील भुतेघर,उंबरी,खिंगर,आंबरळ,दांडेघर, भोसे आणि भिलार अशा ७ गावांमध्ये वन बंधारे निवडून त्यातील गाळाचा उपसा करण्यात आलाय. यात पाणी अडवल्यामुळे पाणी टंचाई कमी होण्यास मदत होत आहे असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला


पाणी अडवण्यासाठी वनबंधा-यांची ही संकल्पना आता गावोगावी राबवली जाऊ लागीये.. त्यामुळे आता लवकरच महाबळेश्वरमधील पाणीटंचाई दूर होणार आहे..