पाऊस लांबल्याने नाशिकमधील नांदगाव तालुक्याला फटका
सध्या स्थितीत नांदगाव तालुक्यातील ७ गावांसह ६१ वाडया - वस्त्यांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
नाशिक: पाऊस लांबल्याने त्याचा सर्वाधिक फटका नाशिकच्या नांदगाव तालुक्याला बसला आहे. भर पावसाळ्यातही तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय.
७ गावांसह ६१ वाडया - वस्त्यांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा
सध्या स्थितीत नांदगाव तालुक्यातील ७ गावांसह ६१ वाडया - वस्त्यांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १५ विहिरी अधिग्रहण केल्या असून , टंचाई लक्षात घेता आणखी सहा गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव प्राप्त झालाय.
पाऊस लांबला तर...
दरम्यान, पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर टँकरद्वारे दिले जाणारे पाणी अत्यंत दूषित असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.