मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी यंदा रायगडावर (Raigad) न येण्याचं आवाहन शिवप्रेमींना केलं आहे. 'घरी आपलं कुटुंब आहे, त्यांची काळजी आपण केली पाहिजे. आपण जगलो तरच पुढच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येवू शकतो. असं आवाहन त्यांनी केलं आहे. पण यासोबतच छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका ही केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जी चूक कुंभमेळ्यात झाली, जी चूक मेट्रोच्या उद्घाटनात झाली आपण ती चूक करायची नाही. प्रत्येकाने रायगडावर न येता घरा घरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावे. असं आवाहन त्यांनी केलं. 


मी रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळयात खंड पडू देणार नाही. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


खासदार संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. ६ जून हा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) दिन आता सर्व कॉलेजमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या जीआरची प्रत उदय सामंत संभाजीराजेंना देणार आहेत.