Modi Government 3rd Term Ajit Pawar NCP Group :  केंद्रात पुन्हा एकदा प्रतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी विराजमान होतायत. मंत्रिमंडळ विस्तार हा मोदी सरकारसाठी डोकदुखी ठरला आहे. कारण, मंत्रीपद न मिळाल्याने NDA मधील अनेक घटक पक्ष नाराज झाले आहेत. यात चर्चा आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाची. कारण,  राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्री मंडळात स्थान मिळालेले नाही. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज झाला आहे. मात्र, आम्हाला मंत्रीपद पाहिजेच अंस म्हणत अजित पवार हे कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहेत. 


आम्ही थांबायला तयार आहोत पण आम्हाला  कॅबिनेट मंत्रीपद पाहिजेच 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही थांबायला तयार आहोत पण आम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे अशा मागणीवर अजित पवार ठाम आहेत.  काल रात्री आम्हाला संपर्क केला होता. त्यापूर्वी राजनाथ सिंग, अमित शाह, जे पी नड्डा यांच्याशी बैठक झाली. राज्यातील निकाला संदर्भात चर्चा झाली. त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली होती की राज्यसभेत आमचे 3 सदस्य होणार आहेत.  लोकसभेत एक असे एकत्रित पणे 4 खासदार होतील. त्यामुळे एक मंत्रीपद मिळावं अशी मी विनंती केली.
काल त्यांचा आम्हाला मॅसेज आला की स्वतंत्र प्रभार देण्याची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवंय असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही मंत्री पद नाकारल असं अजित पवार म्हणाले.  


अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर


अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी ही ऑफर नाकारली आहे. पुढील वेळेस मंत्रीपद दिलं तरी चालेलं असं सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिलीये. कॅबिनेट मंत्री राहिल्यानं राज्यमंत्रीपद स्वीकारणं योग्य वाटलं नाही असं स्पष्टीकरण स्वत: प्रफुल्ल पटेलांनी दिले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणालेत. त्याचबरोबर सुनील तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने 7 जागांवर विजय मिळवला.. तेव्हा त्यांच्या वाट्याला केंद्रात एक मंत्रिपद निश्चिच झाले आहे.