पालघर : पालघर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सफाळे जवळ तीन गावठी बनावटीची सिंगल बोर बंदूक, नवीन बंदुका बनवण्याचा नळ्या, 21 काडतुसे, 84 शिष्याचे छरे, गावठी बनावटीचे बंदूक बनवण्याचे साहित्य आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालघर मधील सकाळे पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सोनावे फोंडा पाडा या गावाच्या हद्दीत मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर दहशतवाद विरोधी कक्षाने सफाळे जवळील सोनाळे फोंडा पाडा येथील एका झोपडीत गावठी बनावटीच्या नवीन बंदुका तयार करण्याचे साहित्य, जिवंत काडतुसे, वापरण्यात आलेल्या काडतुस पुन्हा नवीन करण्याचे साहित्य असा मोठा साठा ताब्यात घेतला आहे.