मुंबई : यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार आहे. भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) तसा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्रात कोकण पट्ट्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तापमानात (Weather) अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार आहे. कोकण पट्ट्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक वाढ होईल. तर विदर्भातही उन्हाळा अधिक तीव्र असणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


तापमान वाढीने उष्माघाताचा धोका, अशी घ्या काळजी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या चालू असलेला महिना अर्थात मार्च ते पुढील मे महिन्यादरम्यान देशभरात कडक उन्हाळा असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. लोकांना केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीदेखील गरमीपासून सुटका मिळणार नाही, असेच दिसून येत आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, प. बंगाल, झारखंड, छत्तीसगड या राज्यांत उष्ण हवामान जास्त राहण्याची शक्यता आहे.


तसेच गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, ओडिशा, कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा समुद्र किनाऱ्याचा भाग याठिकाणी तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.  दरम्यान, 2006 नंतर पहिल्यांदाच यंदाचा फेब्रुवारी महिना कडक होता. तर दिल्लीत 12 वर्षानंतर 7 मार्च अर्थात रविवार हा उधिक कडक होता.


दरम्यान, दिल्लीतही पारा वाढला आहे. गेल्या 9 वर्षानंतर रविवार हा सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. 2012 नंतर रविवार हा दिल्लीचा सर्वात उष्ण दिवस होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारीचे कमाल तापमान सामान्यपेक्षा 5 डिग्री आणि सामान्यपेक्षा 34.4 डिग्री सेल्सियस होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज सोमवारी कमाल तापमान 31 आणि किमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.



गुलाबी थंडीची चाहूल गायब


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दिल्लीत वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 30 किलोमीटर राहील. या आठवड्याच्या अखेरीस किमान तापमान 16 आणि जास्तीत जास्त 34 राहील. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हवामान स्वच्छ राहील आणि येत्या 24 तासांत जोरदार वारे वाहू शकतील. त्याचबरोबर, किमान तापमानातही वाढ होण्यास सुरवात होईल. यामुळे दिवस तसेच रात्री उष्णता वाढेल आणि दिल्लीच्या लोकांना गुलाबी थंडीचा त्रास कमी होईल.


थंडीच्या दिवसात प्रशांत महासागरात ‘ला नीना’चा प्रभाव जास्त होता. यामुळे यंदा थंडी खूप पडली होती. दरम्यान, आता वादळाचा प्रभाव कमी होत आहे. याचमुळे तापमान वेगाने वाढत आहे. ‘ला नीना’चा प्रभाव जर कायम राहीला असता तर थंड हवा कायम राहिली असती. मात्र, तसे काही झालेले नाही. त्यामुले या वादळाचा प्रभाव ओसरल्यामुळे पुढील तीन महिन्यांत कडक उन्हाळ्याचा सामना लोकांना करावा लागू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.


दिल्लीत रविवार सर्वाधिक 'हॉट'


दिल्लीत रविवारी नजफगड परिसर 35.3 अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात कडक दिवस होता. किमान तापमान 18.6 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. याशिवाय अयानगर येथे कमाल तपमान 34.4, क्रीडा संकुलात 33.8 आणि कडा क्षेत्रात 33.5 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले.


दरम्यान, बदलत्या हवामान परिस्थितीमुळे दिल्ली-एनसीआरची हवा खराब वर्गात राहिली. गाझियाबादची हवा अत्यंत खराब प्रकारात नोंदली गेली. तथापि, येत्या 24 तासांत हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सरासरी श्रेणी गाठेल. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिल्लीची एक्यूआय 256 होती.