Maharashtra Weather Updates:  राज्यात थंडीचा पारा (Cold Wave in Maharashtra) आता वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंस सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली. याबाबत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा (maharashtra weather news) काही भाग, मराठवाडा तसेच विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, जळगाव अशा काही भागात थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) पारा चांगलाच घसरला असून उत्तरेकडील राज्यात थंडीची तीव्र लाट आली. त्याचाच परिणाम महाराष्ट्रावर झाला. विदर्भात काही भागांत थंडीच्या (Cold Vidarbha) लाटेची स्थिती निर्माण झाली. निफाडमध्ये राज्यातील नीचांकी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर गोंदियात 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवण्यात आलं. मराठवाड्यातील तापमानाचा पाराही घटलाय. वाढत्या थंडीचा जनजीवनावर परिणाम होताना दिसतोय. उर्वरित महाराष्ट्रातही 2 दिवसांत तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. 


वाचा : देशातील 'ही' राज्ये थंडीने गोठणार; हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी! 


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. परिणामी थंडी जणू अचानकच गायब झाली होती. हेच तापमान पुढे चालू राहणार नसून पुढच्या दोन तीन दिवसात राज्यातील किमान तापमानात 2-3 अंशांची घट होणार असून त्यानंतर पुन्हा तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून नुकतीच देण्यात आली होती.